राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार “MY Bharat Budget Quest – 2026” ही राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धा दि. १ फेब्रुवारी २०२६ पासून MY Bharat प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आलेली आहे.
विद्यार्थी खालील पोर्टलद्वारे स्पर्धेत सहभागी होऊ शकतात:
स्पर्धेच्या व्यापक प्रसारासाठी प्रचार व संदर्भ साहित्य पुढीलप्रमाणे उपलब्ध आहे: इन्फोग्राफिक्स व पोस्टर्स: https://drive.google.com/drive/folders/1Lh8cJCkPgS6R2NqrozufIBnYpYz8_VUJ?usp=sharing
सदर पोस्टर्सची कॉपी प्रत्येक महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रदर्शित करावी, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील. कार्यक्रमाची माहिती, उद्दिष्टे व कालावधी यांचा समावेश असलेले PowerPoint सादरीकरण जनजागृती, मार्गदर्शन व ओरिएंटेशन सत्रांसाठी वापरावे.
प्रसार कार्याचा आढावा घेण्यासाठी Google Sheet ट्रॅकिंग लिंक पुढीलप्रमाणे आहे: https://docs.google.com/spreadsheets/d/1lVovhrzFacPJCxRmyNqQbGcSnFz55QU4R3xWxCRhtac/edit?usp=sharing
सर्व महाविद्यालयांनी PPT चा वापर करून विद्यार्थ्यांना स्पर्धेबाबत माहिती द्यावी.
या उपक्रमाचा उद्देश केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत जागरूकता वाढवणे व युवकांचा सक्रिय सहभाग वाढवणे हा आहे. स्पर्धेतील विजेत्यांना भारताचे माननीय पंतप्रधान यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
सर्व महाविद्यालयांनी सदर उपक्रमांतर्गत योग्य ती कार्यवाही करून प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र, नोटीस बोर्डवर प्रदर्शित केलेल्या पोस्टर्स चे फोटो व अहवाल विश्वविद्यालयाच्या रा.से.यो. कक्षास दि. १८/०२/२०२६ पर्यंत nsskalidasa@gmail.com या ईमेल वर सादर करावे.
